खेड पंचायत समितीमध्ये मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट

खेड : येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात गुरुवार, दि.७ रोजी मतदार जगृतीसाठी सेल्फी पॉईंटचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते झाले. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून दि. २० रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये सर्व मतदारांनी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक असून याबाबत सर्वच शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे.

त्याचाच भाग म्हणून खेड पंचायत समितीमध्ये गुरुवार, दि.७ रोजी मतदान जनजागृती सेल्फी पॉईंट उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, परशुराम इचुर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 09/Nov/2024