कोकण रेल्वेमार्गेवर गांधीधाम एक्स्प्रेसही धावणर नव्या एलएचबी कोचेससह

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी नव्या एलएचबी कोचेससह धावताना दिसणार आहे. रेल्वेने जुने पारंपरिक डबे बदलून त्याऐवजी अत्याधुनिक श्रेणीतील एलएचबी रेक गाड्यांना जोडण्यात येत आहेत. त्यानुसार हा बदल केला जात आहे.

कोकण रेल्वेमार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम एक्सप्रेस (१६३३६/१६३३५) या गाडीला नागरकोइल येथून सुटताना दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या फेरीपासून, तर (१६३३५) गांधीधाम येथून नागरकोईलच्या दिशेने धावताना दि. २९ नोव्हेंबर २०२४ च्या फेरीपासून या गाडीला एलएचबी श्रेणीतील डबे जोडले जातील. या बदलामुळे गांधीधाम एक्स्प्रेसच्या सुधारित कोचरचनेनुसार टू टायर एसी १, श्री टायर एस.सी. ५, स्लीपर ११, सर्वसाधारण श्रेणीती २ डबे, पॅन्ट्री कार १, एलएलआर १, जनरेटर कार १ असे एकूण २२ एलएचबी कोच असतील.

याआधी ही गाडी २३ डब्यांची होती. एलएचबी श्रेणीतील डब्यांमध्ये असान क्षमता आधीच्या तुलनेत वाढत असल्याने आता ही गाडी २३ ऐवजी २२ एलएचबी डब्यांची धावणार आहे. जुन्या डब्यांऐवजी आता नवीन एलएचबी रेकसह धावणार असल्याने कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या आणखी एका रेल्वे गाडीतील प्रवास हा अधिक आरामदायी तसेच सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 09/Nov/2024