मिऱ्या गावात महायुतीची समन्वय बैठक; उदय सामंत यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार

रत्नागिरी : मिऱ्या गावचे विशाल उर्फ घाऱ्या मयेकर यांच्या आयोजनाखाली आणि शिवसेना उमेदवार उदय सामंत यांच्या उपस्थितीत मिऱ्या गावात महायुतीची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. सर्वांनी उदय सामंत यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या विविध योजना समजावून सांगितल्या. मोठ्या संखेने महिला देखील या बैठकीला उपस्थित होत्या.

यामध्ये रूपेश शिवलकर, संदीप शिरधनकर, सुरेंद्र शिरधनकर, दादा शिवलकर, ग्रामपंचायत सदस्य रामदास बनप, अनिता शिरधनकर, अनन्या शिवलकर, मृणाली पाटील, अजित शिवलकर, अमित सावंत, दीपिका मयेकर, सोनू सर, अभी सावंत, शशांक सावंत, सागर कदम, अक्षय सुर्वे, निलम बनप, विशाखा शिवलकर, रोहिणी सुर्वे, आराध्या सुर्वे, पायल चव्हाण, अमोल विलणकर, मुन्ना भाटकर, समीक्षा भाटकर, राणी भाटकर आदि उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 09-11-2024