Nitesh Rane Sanjay Dutt Statement: “संजय दत्तने १५ दिवस पाकिस्तानमध्ये जाऊन राहावे”; अभिनेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेंचा घणाघाती पलटवार

Nitesh Rane Sanjay Dutt Statement: "संजय दत्तने १५ दिवस पाकिस्तानमध्ये जाऊन राहावे"; अभिनेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणेंचा घणाघाती पलटवार

संजय राऊत आणि रोहित पवारांवरही डागली टीकेची तोफ

*मुंबई :* प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने भारत देशातील शांततेबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. ‘भारतामध्ये आता पूर्वीसारखी शांतता दिसत नाही, महादेवाचरणी प्रार्थना आहे की ते जुने दिवस पुन्हा यावेत,’ असे वक्तव्य संजय दत्तने केले होते. या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. “हे कलाकार आपल्या देशात राहून मोठे होतात, नाव कमवतात आणि देशावरच टीका करतात,” असा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी केला.

*”पाकिस्तान किंवा शेजारच्या देशांत जाऊन राहा”*
संजय दत्तच्या विधानाचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले, “आज भारतामध्ये अत्यंत सुरक्षिततेचे वातावरण असून सगळे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. संजय दत्तने शेजारच्या देशांची परिस्थिती जाऊन पाहावी. त्यांनी १५ दिवस पाकिस्तानमध्ये किंवा आजूबाजूच्या दोन-पाच देशांमध्ये जाऊन राहावे, म्हणजे भारत किती सुरक्षित देश आहे याची जाणीव त्यांना होईल.”

*संजय राऊत आणि रोहित पवारांवर निशाणा*
यावेळी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांच्या भाकितांवर टोला लगावताना ते म्हणाले, “संजय राऊत यांनी केलेली एक तरी भविष्यवाणी खरी ठरली आहे का? आमचे सरकार आल्यापासून ‘दोन महिन्यांत पडणार, चार महिन्यांत पडणार’ असे ते रोज सांगत आहेत. मात्र, आमचे महायुती सरकार दिवसेंदिवस अधिक भक्कम होत आहे. आता त्यांचे घरचेही त्यांना गांभीर्याने घेत नाहीत.”

Tata punch

तसेच MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून रोहित पवारांवर टीका करताना राणे म्हणाले, “मूळ आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आहे. मात्र, जर त्या ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेले पत्रकारच सुरक्षित नसतील, तर प्रसारमाध्यमांनी रोहित पवारांच्या बातम्या दाखवाव्यात की नाही, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.”