रत्नागिरी : लघुउद्योजक प्रशिक्षणासाठी नोंदणीचे आवाहन

रत्नागिरी : शासानाच्या राज्य संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या लघुउद्योग प्रशिक्षण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १ हजार ७२५ लघुउद्योजकांची नोंदणी झाली आहे. आगामी काळात सुमारे ८ हजार लघुउद्योजक निर्माण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. खुल्या प्रवर्गातील कुठल्याही शासकीय विभाग, योजना, महामंडळे, उपक्रम यांच्याकडून लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाने ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आहे. लाभार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान आंतरवासिता (इंटर्नशिप), व्यवसाय सुरू करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, लाभार्थ्यांना बँकिंग व वित्तीय संस्थांमार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी साहाय्य व मार्गदर्शन, व्यवसाय प्रसिद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, उद्यम नोंदणी आणि प्रकल्प भेटीद्वारे साहाय्य आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 09/Nov/2024