राजापूर : फुपेरे भोवडवाडीतील ‘श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी महोत्सव

राजापूर : राजापूर तालुक्यातील फुपेरे येथील भोवडवाडी उत्कर्ष मंडळ, फुपेरे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही ‘श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर कार्तिक एकादशी महोत्सव २०२४’ साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त मंगळवारी १२ रोजी भोवडवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

फुपेरे भोवडवाडी येथील भोवडवाडी उत्कर्ष मंडळ, फुपेरे यांच्या वतीने दरवर्षी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर कार्तिक एकादशी महोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा १२ रोजी सकाळी ७ ते ८ वा. वारकरी दिंडी, ८ ते १० वा. पूजापाठ, आरती, १० ते १२ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी २ ते ३ वा. हळदी-कुंकू, ३ ते ४ वा. उपासना यज्ञ आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यासोबत मंदिरामध्ये दुपारी ४ वा. पासून सायंकाळपर्यंत सावंतवाडी भजन मंडळ, फुपेरे, लिगमवाडी भजन मंडळ फुपेरे, वासिया प्रासादिक भजन मंडळ चिखलगाव, राऊतवाडी विकासमंडळ आंगले, जांगलदेव प्रासादिक मंडळ चिखलगाव, नाचणेकरवाडी नं. १ भजन मंडळ गोठणेदोनिवडे, राघववाडी भजन मंडळ गोठणेदोनिवडे, कुणकेश्वर भजन मंडळ किंजळवणे, पुजारवाडी भजन मंडळ आडवली या मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या व्यतिरिक्त कार्तिक एकादशीनिमित्ताने मंदिरामध्ये सिंधुदुर्गातील बुवा रिया मेस्त्री (श्री स्वामी समर्थ नवतरूणी प्रासादिक भजन मंडळ) विरुद्ध श्रीकांत शिरसाट (ओम चैतन्य भजन मंडळ मुंबई) यांच्यामध्ये भजनाचा डबलबारीचा जंगी सामना होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 09/Nov/2024