गुहागर : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात बुधवार १३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान कार्तिकोत्सव तसेच दिनांक ११ व १२ रोजी श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
११ ते १७ नोव्हेंबर २०२४ रोजी स. ६.३० ते ७ वाजता श्रींची महापूजा, रात्री ९ वा. आरती व मंत्रपुष्प, तसेच दि. ११ ते १६ नोव्हेंबर २०२४ रोजी ७ ते १२.३० वाजता वेदमूर्ती घनपाठी श्री दत्तात्रेय महादेव मुरवणे यांच्या अधिपत्त्याखाली ऋग्वेद संहिता स्वाहाकार होईल. सायं. ६.३० वाजता नित्य उपासना व आरती हे दैनंदिन कार्यक्रम करण्यात येणार आहेत. गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात ११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ रोजी रात्री ९.३० वा. कार्तिकी एकादशीनिमित्त वरचापाट ग्रामस्थांचे भजन, १२ रोजी रात्री ९.३० वाजता वर्धापन दिनानिमित्त श्री गोपाळकृष्ण आरती मंडळ, खालचापाट यांची आरती, १३ रोजी दुपारी ४ ते ६.३० या वेळेत हळदी- कुंकू, रात्री ९.३० वाजता ह.भ.प. सुमंतबुवा भिडे यांचे सुश्राव्य कीर्तन, १४ रोजी दुपारी ४ वाजता दुर्गाश्री महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ९.३० वाजता मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, (नाव नोंदणी करीता समीर घाणेकर यांचेकडे संपर्क साधावा.) शुक्रवार दि. १५ रोजी रात्रौ १० वाजता वसंत कानेटकर लिखित गोष्ट जन्मांतरीची ही दोन अंकी नाट्य कलाकृती, १६ रोजी दुपारी १२ वा. ऋग्वेद संहिता स्वाहाकार पूर्णाहुती, रात्रौ ९.३० वाजता कै. गोविंदराव विठ्ठल पटवर्धन संगीत गौरव पुरस्कार २०२४ व सांस्कृतिक कार्यक्रम, १७ रोजी रात्रौ ९.१५ वा. ह.भ.प. सुमंतबुवा भिडे यांचे कीर्तन होणार आहे. रात्रौ १० वा. कै. विद्याधर गोखले लिखित जय जय गौरीशंकर नाट्य कलाकृती सादर करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 09/Nov/2024














