MPSC Student Protest Update: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन स्थगित; विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून विद्यार्थी परिषद स्वतंत्र आंदोलन उभारणार

MPSC Student Protest Update: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन स्थगित; विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून विद्यार्थी परिषद स्वतंत्र आंदोलन उभारणार

सरकारकडून सर्व मागण्या मान्य, मात्र अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; तक्रारदार ऋषीकेश गांगर्डे यांची घोषणा

अहिल्यानगर/पुणे:
MPSC Student Protest Update: एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे तब्बल ११ दिवस मोठे आंदोलन सुरू होते. अखेर या आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा न झाल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. भीमनवार हे केवळ सक्तीच्या रजेवर गेल्यामुळे, त्यांच्या राजीनाम्यासाठी येत्या दोन महिन्यांत स्वतंत्र विद्यार्थी संघटना स्थापन करून पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा पेपरफुटीतील मूळ तक्रारदार ऋषीकेश गांगर्डे यांनी केली आहे.

पुण्यामध्ये MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते. परंतु, अध्यक्ष भीमनवार यांचा राजीनामा न घेताच हे आंदोलन स्थगित करण्यात आल्यामुळे मूळ तक्रारदार ऋषीकेश गांगर्डे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता आगामी दोन महिन्यांत "MPSC विद्यार्थी परिषद" या स्वतंत्र विद्यार्थी संघटनेची स्थापना करून तीव्र लढा दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत MPSC चे अध्यक्ष राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून यासाठी CJP चे सहकार्य देखील घेतले जाणार आहे. यापुढील सर्व आंदोलनांचे निर्णय केवळ विद्यार्थीच घेतील आणि ते विद्यार्थ्यांच्याच नेतृत्वात पार पडतील, असेही गांगर्डे यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय नेत्यांचा किंवा व्यक्तींचा केवळ पाठिंबा घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

MPSC Student Protest Update: आंदोलनाचा समारोप आणि नेत्यांच्या भूमिकेवर चर्चा
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले असून, शेवटच्या क्षणी ऋषीकेश गांगर्डे यांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला होता. सरकारकडे पाठविण्यात आलेल्या मसुद्यात (ड्रामध्ये) विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची स्पष्ट मागणी समाविष्ट नव्हती, असा आक्षेप घेत त्यांनी अहिल्यानगर गाठले होते.

Amey jwelrs

दुसरीकडे, या संपूर्ण आंदोलनाचा चेहरा ठरलेले विवेकानंद पाटील यांनी देखील आपले गाव गाठल्यानंतर त्यांचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत करण्यात आले. आमदार रोहित पवार आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले होते आणि सरकारच्या आश्वासनानंतर ते मागेही घेण्यात आले. मात्र, आता स्वतंत्र विद्यार्थी परिषदेकडून आगामी काळासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.