Lanja Shirambavali Pali Bus: लांजा-शिरंबवली-पाली बसफेरीचा दिमाखात शुभारंभ; ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टळली

Lanja Shirambavali Pali Bus: लांजा-शिरंबवली-पाली बसफेरीचा दिमाखात शुभारंभ; ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टळली

Lanja Shirambavali Pali Bus फेरीत बदल; पोलीस पाटील दर्शना सावंत आणि सर्वेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नांना यश

लांजा :
Lanja Shirambavali Pali Bus फेरी अखेर प्रवाशांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नव्याने सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांची सातत्यपूर्ण मागणी आणि पोलीस पाटील दर्शना सावंत यांच्यासह सर्वेश तेंडुलकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लांजा ते शिरंबवली मार्गे पाली या बसफेरीला हिरवा कंदील मिळाला. या नवीन एसटी बसफेरीचा अधिकृत शुभारंभ लांजा आगाराचे आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साही वातावरणात करण्यात आला.

जुन्या वेळेमुळे प्रवाशांची होणारी धावपळ
यापूर्वी लांजा बसस्थानकातून सकाळी ७.३० वाजता लांजा-पाली-शिरंबवली-लांजा ही बस सुटत होती. मात्र ही वेळ अत्यंत भल्या पहाटेची असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्गाची मोठी धावपळ होत होती. सकाळी घरातील कामे आटोपून बस पकडणे कठीण जात असल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे त्यांच्यावर नाहक आर्थिक भार पडत होता. या मार्गावर सकाळी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली होती.

आमदार किरण सामंत व आगार व्यवस्थापकांना निवेदन
विद्यार्थी व स्थानिक प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन पोलीस पाटील दर्शना सावंत यांनी आमदार किरण सामंत आणि लांजा एसटी डेपो मॅनेजर प्रकाश झोरे यांना अधिकृत निवेदन दिले होते. लांजा बसस्थानकातून सकाळी सुमारे ९.३० वाजता दुसरी बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली होती. प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेत सकाळी ९.३० वाजताची ही नवीन फेरी मंजूर केली.

Tata harrier

मान्यवरांची उपस्थिती अन् गावात जल्लोषात स्वागत
बसफेरीच्या शुभारंभ प्रसंगी आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस पाटील दर्शना सावंत, एसटी चालक-वाहक, वाहतूक निरीक्षक, पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बस शिरंबवली गावात पोहोचताच ग्रामस्थांनी तिचे जंगी आणि उत्साहात स्वागत केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत चव्हाण, श्रीधर सावंत, आत्माराम धावडे, परशुराम पवार, अशोक चव्हाण, संदीप सावंत, संतोष सरफरे, आत्माराम सावंत, रघुवीर सावंत, मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, अंगणवाडी सेविका अंजली चव्हाण, मदतनीस श्रेया सावंत, भक्ती सरफरे, विद्यार्थी मंथन सावंत व रुंजी पवार यांच्यासह चव्हाण वाडी आणि सावंतवाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.