Choravane Ramvardayini Navratri: श्रीक्षेत्र चोरवणे येथे रामवरदायिनी देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ; २० ऑक्टोबरपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Choravane Ramvardayini Navratri: श्रीक्षेत्र चोरवणे येथे रामवरदायिनी देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ; २० ऑक्टोबरपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

विजयादशमीला दसरा व सीमोल्लंघनाने होणार सांगता

खेड :
Choravane Ramvardayini Navratri म्हणजेच श्रीक्षेत्र चोरवणे येथील आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे खास आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेने सुरू झालेल्या या उत्सवामुळे संपूर्ण चोरवणे मंदिर परिसर सध्या भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

नित्य पूजा, गरबा आणि भजनांचे आयोजन
उत्सवाच्या काळात दररोज देवीचा महाअभिषेक, विधिवत पूजा, महामंगल आरती, हरिपाठ, भजन आणि गरबा यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. दररोज देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी प्रमुख कार्यक्रमांची रूपरेषा
उत्सवाच्या नियोजनानुसार १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता तिसंगी येथील महिला भजन मंडळाचा विशेष भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १७ ऑक्टोबर रोजी शिवव्याख्यानानंतर रात्री १० वाजता नाचाचा जंगी सामना रंगणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी महाअभिषेक, विधिवत पूजा, दुर्गाष्टमी होम-हवन व गरबा यांसारखे धार्मिक विधी पार पडणार असून दुपारी ३ वाजता ‘स्वराभिषेक’ या भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला जाईल.

Tata motars tiago

विजयादशमीला होणार उत्सवाची सांगता
या नवरात्रोत्सवाची सांगता २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक दसरा व सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाने होणार आहे. श्रीक्षेत्र चोरवणे आणि परिसरातील सर्व भाविकांनी श्री रामवरदायिनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासोबतच सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.