Ratnagiri Kharbhoomi Development Project: २७.५७ कोटींचा निधी मंजूर, तरीही रत्नागिरीतील ४ खारभूमी प्रकल्प कागदावरच

Ratnagiri Kharbhoomi Development Project: २७.५७ कोटींचा निधी मंजूर, तरीही रत्नागिरीतील ४ खारभूमी प्रकल्प कागदावरच

Ratnagiri Kharbhoomi Development Project मधील कामांची गती मंदावली; वित्तीय प्रगतीबाबत खारभूमी विभाग पूर्णपणे अनभिज्ञ

रत्नागिरी : Ratnagiri Kharbhoomi Development Project म्हणजेच कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खारभूमी विकासकामांचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. शासनाकडून तब्बल २७ कोटी ५७ लाख ३३ हजार ३२५ रुपयांचा निधी मंजूर झाला असूनही जिल्ह्यातील एकूण ८ खारभूमी योजनांपैकी चार योजनांची कामे पूर्णपणे ठप्प आहेत. उर्वरित चार योजनांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, आश्चर्यकारक बाब म्हणजे कामांच्या ‘वित्तीय प्रगती’बाबत खारभूमी विभागाला कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मंजूर निधी अन् १६ महिन्यांची मुदत ठरली कागदी
आपत्ती व्यवस्थापन व खारभूमी संरक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये खारभूमी योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सर्व कामांसाठी सुमारे २७ कोटी ५७ लाख रुपयांची निविदा मंजूर करून १६ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश कामे कासवगतीने सुरू असून काही ठिकाणी कामे सुरूच झालेली नाहीत, अशी गंभीर स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
*
सुरू असलेली कामे अन् त्यांची भौतिक प्रगती*
सध्या जिल्ह्यात केवळ ४ ठिकाणी कामे सुरू असून त्यांची भौतिक प्रगती पुढीलप्रमाणे आहे:

कर्ला खारभूमी योजना (रत्नागिरी): ५८ टक्के

Amey jwelrs

कासारवेली खारभूमी योजना (रत्नागिरी): ५५ टक्के

पोमेंडी खारभूमी योजना (रत्नागिरी): २८ टक्के

काजरवाडी खारभूमी योजना (रत्नागिरी): २७ टक्के

चार खारभूमी योजनांची प्रगती ‘शून्य टक्के’
तर दुसरीकडे नांदिवडे (रत्नागिरी), गावखडी (रत्नागिरी), माळवी (दापोली) आणि पेवे उंबरशेत (मंडणगड) या चार खारभूमी योजनांची भौतिक प्रगती ‘शून्य टक्के’ असून ही कामे अद्याप सुरूच करण्यात आलेली नाहीत.

चौकशी करून कामे पूर्ण करण्याची मागणी
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना आणि कामे पूर्ण होण्याची मुदत निश्चित केलेली असतानाही, प्रशासकीय उदासीनतेमुळे या कामांची वित्तीय माहिती विभागाकडे नाही. या दिरंगाईमुळे खारभूमी भागातील शेतकरी आणि गावकऱ्यांना या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या संथगतीने चाललेल्या व रखडलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करून ती त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.