Tukaram Mundhe FDA Order: मसाल्यांमध्ये भेसळ आणि कृत्रिम रंगांवर राज्यात बंदी, उल्लंघन केल्यास होणार कारवाई; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा

Tukaram Mundhe FDA Order: मसाल्यांमध्ये भेसळ आणि कृत्रिम रंगांवर राज्यात बंदी, उल्लंघन केल्यास होणार कारवाई; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी; नियम मोडल्यास २००६ च्या कायद्यानुसार दंड अन् थेट कारावासाची होणार शिक्षा

मुंबई :
Tukaram Mundhe FDA Order संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मसाल्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीबाबत नवीन कडक नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील अनेक भागांत मसाल्यांमध्ये घातक रंगांची व इतर पदार्थांची भेसळ होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर, ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

कृत्रिम रंग, लाकडाचा भुसा आणि अर्क काढलेल्या मसाल्यांवर पूर्ण बंदी
पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, कृत्रिम रंग, लाकडाचा भुसा, अर्क काढलेले मसाले आणि परकीय पदार्थ टाकल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. हळद, मिरची, दालचिनी, काळीमिरी, लवंग आणि खसखस यांसारख्या सर्वच मसाल्यांमध्ये आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंग किंवा इतर सामग्री वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. तसेच मसाल्यांवर इथिलीन ऑक्साईडचा (Ethylene Oxide) वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी; परवाना असणे बंधनकारक
एफडीएने जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार राज्यात आता सुटे (Open) मसाले विक्री करता येणार नाहीत. वैध परवान्याशिवाय (Valid License) मसाल्यांचे उत्पादन किंवा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मसाल्यांची साठवणूक केली जाणारी जागा पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नवीन नियम मसाले उत्पादक, किरकोळ व घाऊक विक्रेते, वाहतूकदार आणि हॉटेल व्यावसायिक या सर्वांवर बंधनकारक असणार आहेत.

Tata altroz

नियम मोडल्यास दंडासह थेट कारावासाची शिक्षा
महाराष्ट्रात सध्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग्स’ अभियान प्रभावीपणे राबवले जात असून, डेअरी उत्पादनांनंतर आता मसाल्यांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ (FSSAI Act, 2006) नुसार मोठा दंड आणि थेट कारावासाची शिक्षा सुनावण्यात येईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.