चणकर चाळ, जे.के. फाईल्स आणि लायन्स क्लब रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या चार चालकांवर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई
रत्नागिरी: शहरानजीकच्या नाचणकर चाळ, जे.के. फाईल्स ते गद्रे कंपनी रस्ता आणि लायन्स क्लब ते एसटी वर्कशॉपकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर इतर वाहनांच्या वाहतुकीला धोका व अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी चार वाहनचालकांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही विशेष कारवाई बुधवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी ९:५५ ते सायंकाळी ७:२० या कालावधीत करण्यात आली.
‘या’ चार वाहनचालकांवर झाली कारवाई
वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयित चालकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
शमशाद अहमद गुलाम हसन हुसेन (वय ३४, रा. उत्तर प्रदेश)

इराप्पा सिध्दाप्पा बाळगानूर (वय ३९, रा. क्रांतीनगर, रत्नागिरी)
इरफान सई मोहम्मद शहा (वय ३६, रा. एमआयडीसी, रत्नागिरी)
जमाल मोहम्मद ताहीर खान (वय ४५, रा. एमआयडीसी, रत्नागिरी)
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
संबंधित चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने मुख्य रस्त्यावर निष्काळजीपणे उभी करून सार्वजनिक वाहतुकीला आणि इतर वाहनधारकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चारही चालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावर निष्काळजीपणे व अडथळा ठरेल अशा रीतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात अशीच कडक कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.













