India vs Zimbabwe Women’s 1st T20: आजपासून भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिकेला प्रारंभ; स्मृती मानधना पहिल्यांदाच सांभाळणार नेतृत्व

India vs Zimbabwe Women's 1st T20: आजपासून भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिकेला प्रारंभ; स्मृती मानधना पहिल्यांदाच सांभाळणार नेतृत्व

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार पहिला सामना; संध्याकाळी ७ वाजता होणार सुरुवात, टीव्ही आणि मोबाईलवर असा पाहा लाईव्ह

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आजपासून एका नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. भारतीय महिला संघ मायदेशात झिम्बाब्वे महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांची रोमांचक टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना आज, शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, स्टार फलंदाज स्मृती मानधना नियमित कर्णधार म्हणून पहिल्यांदाच भारतीय महिला संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, त्यामुळे संपूर्ण देशातील क्रिकेट चाहत्यांचे या मालिकेवर विशेष लक्ष लागून राहिले आहे.

सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?
भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमधील पहिला टी-20 सामना आज संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तसेच, सामन्याची नाणेफेक (Toss) संध्याकाळी ६:३० वाजता होईल. हा सामना छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात शफाली वर्मा, रिचा घोष यांच्यासह हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांसारख्या अनुभवी खेळाडूंसोबतच अनुष्का शर्मा आणि निक्की प्रसाद यांसारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

लाईव्ह सामना कुठे व कसा पाहायचा?
क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना पाहण्यासाठी टीव्ही आणि मोबाईलवर विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत:

Happy journey

टीव्हीवर लाईव्ह: भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघांमधील पहिल्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) वर केले जाणार आहे. प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर हा सामना पाहता येईल. तसेच हा सामना डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वरही विनामूल्य पाहता येणार आहे.

मोबाईल आणि ऑन्लाईन प्रक्षेपम: मोबाईल किंवा डिजिटल माध्यमातून सामना पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांना जिओहॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांचे खेळाडू
भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), गुणालन कमलिनी, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अनुष्का शर्मा, जिंतीमणी कलिता, निकी प्रसाद, प्रेमा रावत.

झिम्बाब्वे महिला संघ: केलीस एनधलोवू, बिलावद बिझा, चिपो मुगेरी-तिरिपानो, चिएड्झा धुरुरु (यष्टीरक्षक), न्याशा ग्वांझुरा, जोसेफिन एनकोमो (कर्णधार), मॉडेस्टर मुपाचिकवा, शारने मेयर्स, लोरीन फिरी, फ्रान्सिस्का चिपारे, कुडझाई चिगोरा, नोमवेलो सिबांडा, ओलिंदर चारे, मिशेल मावुंगा, तेंडाई मकुशा.