Prashant Bhushan Regime Change Comment: प्रशांत भूषण यांच्या ‘रिजीम चेंज’ वक्तव्यावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Prashant Bhushan Regime Change Comment: प्रशांत भूषण यांच्या 'रिजीम चेंज' वक्तव्यावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

‘मनात होतं ते ओठांवर आलंच’; प्रशांत भूषण आणि नेहा बोरा यांच्या विधानावर भाजपची कडक टीका

नवी दिल्ली:

Prashant Bhushan Regime Change Comment मुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी देशात ‘रिजीम चेंज’ (सत्ता बदल) हवा असल्याचे विधान केले असून, यामध्ये काहीही चुकीचे नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. गुरुवारी नवी दिल्ली येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रशांत भूषण यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते संबित पात्रा यांनी अत्यंत कडक शब्दांत पलटवार केला आहे.

Arihant 1

‘सर्व खेळ सत्तेची खुर्ची मिळवण्याचा’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
प्रशांत भूषण यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला. "इट्स डन ब्रो, सर्वकाही जाहीर झालंय. अखेर हे सर्वकाही सत्ता बदलासाठीच आहे. शेवटी मनात होतं ते ओठांवर आलंच," असे फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, "सर्व खेळ सत्तेची खुर्ची मिळवण्याचा आहे. मग त्यासाठी विद्यार्थी, शेतकऱ्यांना चिथावणी द्यावी लागली तरी चालेल, जाती आणि भाषेच्या नावावर द्वेष पसरावा लागला तरी चालेल. देशाच्या प्रतिष्ठित संस्थांची प्रतिमा मलिन केली जात असून, आंदोलनाच्या आडून देशात अराजकता पसरवणे हाच यांचा मुख्य उद्देश आहे."

‘बांग्लादेशने आम्हाला शिकवले’; नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांचा दावा
नवी दिल्लीच्या प्रेस क्लबमधील या पत्रकार परिषदेला प्रशांत भूषण यांच्यासोबत नेहा बोरा, अभिजीत दिपके आणि अभिनेते प्रकाश राज उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशांत भूषण म्हणाले, "मोदी सरकार देशात निवडणूक लोकशाही चिरडून टाकण्यावर ठाम आहे. ही अशीच क्रूरता सुरू राहिली तर सत्ता परिवर्तन जरूर होईल. आम्हा सर्वांना सत्ता परिवर्तन हवे आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. सत्ता परिवर्तन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. सरकारविरोधात असंतोष व्यक्त करणे हा गुन्हा नाही."

तसेच, "देशात निवडणूक लोकशाही चिरडण्याची इच्छा असलेले आणि नागरिकांच्या मौलिक अधिकारांशी खेळणारे सरकार सत्तेवर राहू नये," असेही भूषण म्हणाले. या पत्रकार परिषदेत आयसा अध्यक्ष नेहा बोरा यांनी, "ही रिजीम चेंजची लढाई आहे आणि आम्ही रिजीम चेंज करूनच राहणार. रिजीम चेंज कशी होते हे आम्हाला बांग्लादेशने शिकवले आहे," असे विधान केले.

भाजपचा पलटवार; देशद्रोहाची भावना दिसून आल्याचा संबित पात्रा यांचा आरोप
प्रशांत भूषण आणि नेहा बोरा यांच्या या वक्तव्यांवर भाजप नेते संबित पात्रा यांनी जोरदार हल्ला चढवला. "प्रशांत भूषण आणि नेहा बोरा पत्रकार परिषदेत जे बोलले, त्यांच्या बोलण्यातून देशाप्रती गद्दारी दिसून येते, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे," असे पात्रा म्हणाले. विरोधक लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली देशात अराजकता निर्माण करत असल्याचा आरोपही भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे.