दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणाला काठीने मारहाण; रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरातील घटना, एकावर गुन्हा दाखल

दुचाकी न दिल्याच्या रागातून तरुणाला काठीने मारहाण; रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरातील घटना, एकावर गुन्हा दाखल

गाडीची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा नोंद

रत्नागिरी : दुचाकी गाडी वापरण्यास दिली नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका इसमाने तरुणाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. आठवडा बाजार परिसरात देशी बारसमोर ही घटना घडली असून, मारहाणीनंतर आरोपीने गाडीची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडी देण्यास नकार दिल्याने काठीने हल्ला :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष भोजू राठोड (वय ४१ वर्षे, मूळ रा. तांडा, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. रहाटाघर, एसटी स्टँडजवळ, रत्नागिरी) हे नोकरीनिमित्त रत्नागिरीत वास्तव्यास आहेत. बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते आठवडा बाजार येथील देशी बारसमोर उभे होते. यावेळी संशयित आरोपी दीपक राठोड याने त्यांच्याकडे दुचाकी गाडी मागितली. मात्र, फिर्यादी यांनी गाडी देण्यास नकार दिला. याचा प्रचंड राग आल्याने आरोपीने हातातील काठीने संतोष राठोड यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर जोरदार मारहाण करून त्यांना रक्तबंबाळ केले.

Happy journey marathi

जीवे मारण्याची धमकी आणि वाहनाचे नुकसान :

मारहाणीदरम्यान आरोपीने "तू ड्युटी कशी करतोस तेच बघतो," असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याची थेट धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या फिर्यादीच्या दुचाकीला जोराने लाथ मारून पाडले आणि वाहनाचे नुकसान केले. तसेच या घटनेतील साक्षीदारांनाही फोनवरून धमकावण्याचा प्रकार आरोपीने केला.

रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल :

या हल्ल्यात फिर्यादी संतोष राठोड हे जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संशयित दीपक राठोड याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५१(२), ३२४(४) (जुने भादंवि कलम ३२४, ५०६, ४२७) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.