सावंगी येथील १७ व्या दीक्षांत सोहळ्यात २३२० विद्यार्थ्यांना पदव्या
Devendra Fadnavis D.Litt सन्मान सोहळा वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा आज १७ व्या दीक्षांत समारंभात पार पडणार आहे. संस्थेचे नाव बदलल्यानंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण दीक्षांत सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डी. लिट.’ (डॅाक्टर ऑफ लिटरेचर) ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
२३२० विद्यार्थ्यांन पदव्या आणि शोध पदव्या प्रदान
या दीक्षांत सोहळ्यात विविध विद्याशाखांच्या मिळून एकूण २३२० पदव्या विद्यार्थ्याना प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे तब्बल १२३ विद्यार्थ्यांना पीच.डी. (Ph.D.) पदव्या देण्यात येतील. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना १२३ सुवर्णपदके, ७ रौप्यपदके आणि इतर १३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. अभिजात शेठ यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी
शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘नॅशनल मेडिकल कमिशन’चे (NMC) अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांना या समारंभात मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (D.Sc.) पदवी प्रदान करण्यात येणार आहे.














