Horoscope Today 17 October 2026: शनिवारचे राशीभविष्य; जाणून घ्या आज सर्व १२ राशींसाठी कसा असेल दिवस

Horoscope Today 17 October 2026: शनिवारचे राशीभविष्य; जाणून घ्या आज सर्व १२ राशींसाठी कसा असेल दिवस

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिदेवाच्या कृपेने कोणत्या राशीला लाभ मिळणार आणि कोणाला काळजी घ्यावी लागणार? वाचा सविस्तर राशीभविष्य

Horoscope Today 17 October 2026 नुसार, आज १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिवार असून हा दिवस न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. आजच्या दिवशी अनेक राशींच्या ग्रहांच्या स्थितीनुसार दिवस संमिश्र असणार आहे. सर्व १२ राशींचे आजचे भविष्य खालीलप्रमाणे आहे:

मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.

तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची आवर्जून काळजी घ्यावी.

Nadi pariksha

प्रेमाच्या बाबतीत मनात कोणताही अहंकार बाळगू नका.

आजच्या दिवसात कोणताही नवीन निर्णय घेताना विशेष सावधानता बाळगा.

घराच्या आसपास गाय दिसली तर दान करायला विसरू नका, तुमच्यासाठी लवकरच चांगली बातमी येणार आहे.

वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी असणार आहे.

तुमच्या व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसेल.

नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच नवीन प्रोजेक्ट हाती मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असून, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे.

आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा शकाल.

व्यवसायात एखादा महत्त्वाचा करार होऊ शकतो.

संपत्तीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील आणि मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होतील.

कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे.

पाठीशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.

वैवाहिक जीवन अतिशय सुखाचे जाईल.

आज संध्याकाळच्या वेळी तुम्ही पार्टनरला छान भेटवस्तू द्याल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे.

तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मोलाची मदत मिळेल.

कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल, या दरम्यान अनेक नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.

एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता, ते काम तुमचे आज वेळेत पूर्ण होईल.

तुमच्यातील कलागुणांना योग्य वाव मिळेल.

समाजात तुमच्या नावाचं कौтुक केलं जाईल आणि प्रगतीचे अनेक नवीन संकेत निर्माण होणार आहेत.

तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.

यामध्ये तुम्हाला ना मोठा लाभ होईल ना तोटा सहन करावा लागेल.

तुम्ही हाती घेतलेल्या कार्यामुळे अनेकांना रोजगार मिळू शकतो.

त्यामुळे व्यवहारात फक्त स्वतःचाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होईल.

मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा काहीसा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही ढासळू शकतो.

तरीही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न तुम्ही सुरूच ठेवा.

धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे.

आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील.

तुमच्या हाती एखादी चांगली बातमी लागेल.

लवकरच तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता. प्रवासाचे योग असून फक्त तुमचा आळस दूर ठेवा, यश नक्कीच तुमचंच आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी आज अजिबात शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करू नये.

तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही.

तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल, मात्र त्यात फारसा लाभ किंवा तोटा पाहिला मिळणार नाही.

कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य स्वरूपाचा आहे.

दिवसाची सुरुवात अत्यंत प्रसन्न वातावरणात होईल.

पण जसजसा वेळ निघत जाईल, तसतसे तुम्हाला अस्वस्थ किंवा बैचेन वाटेल.

तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील, एकाच वेळी १० गोष्टी डोक्यात सुरू असतील पण योग्य उत्तर सापडणार नाही.

मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आणि चांगला आहे.

तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत आणि चांगली राहील.

मात्र, तरीही पैशांचा अतिवापर किंवा उधळपट्टी करू नका.

महिन्याचा शेवटचा काळ असल्याने व्यवहाराच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील सर्व जुने अडथळे दूर होतील.