Ratnagiri Crime News: शिवार आंबेरे येथील ३१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Ratnagiri Crime News: शिवार आंबेरे येथील ३१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने खालावली होती प्रकृती; पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

Ratnagiri Crime News प्रकरणातून रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या घरगुती वादाच्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन केलेल्या ३१ वर्षीय विवाहितेचा मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Ratnagiri Crime News: कौटुंबिक वादातून उचलले अत्यंत टोकाचे पाऊल
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे, सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या मधुरा मनोज मेस्त्री (वय ३१) यांचा ४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी पतीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या नैराश्यातून मधुरा यांनी राहत्या घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध (रेटॉल) प्राशन केले.

प्राथमिक उपचारानंतर मुंबईतील नायर रुग्णालयात हलवले
विषारी औषध प्राशन केल्याचे समजताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले होते. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने ८ ऑक्टोबर रोजी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Shree krushn shreekhand

पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
मुंबईतील नायर रुग्णालयाकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ३९/२०२६ अशी नोंद केली आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास पूर्णगड पोलिसांकडून सुरू आहे.