Tiger Shroff Shooting Case Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; फॉरेन्सिक तपासात देशी पिस्तुलाचा वापर उघड, आरोपी सुरतच्या दिशेने पसार?

Tiger Shroff Shooting Case Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; फॉरेन्सिक तपासात देशी पिस्तुलाचा वापर उघड, आरोपी सुरतच्या दिशेने पसार?

हल्ल्यापूर्वी संशयितांकडून ४५ मिनिटे रेकी; जुहू परिसरात BMW कारवर झाला होता गोळीबार

मुंबई:

Tiger Shroff Shooting Case Update संदर्भात समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) वाहनावरील हल्ला प्रकरणात पोलिसांचा आणि फॉरेन्सिक टीमचा तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. फॉरेन्सिक तपासात (Forensic Team Report) पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, टायगरच्या BMW कारवर गोळीबार करण्यासाठी देशी बनावटीच्या पिस्तुलाचा (Country-made pistol) वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

हल्ल्यापूर्वी ४५ मिनिटे पुष्पा पार्कजवळ थांबले होते आरोपी
जुहू परिसरात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या खळबळजनक घटनेबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. गोळीबार करण्यापूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी संपूर्ण परिसराची सुमारे ४५ मिनिटे बारकाईने पाहणी (रेकी) केली होती.

Mobile hub

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापूर्वी संशयित आरोपी जुहू येथील ‘पुष्पा पार्क’ परिसरात साधारण ४५ मिनिटे थांबले होते. टायगरची कार येताच त्यांनी गाडीवर गोळीबार केला आणि त्यानंतर तत्काळ पळ काढला.

अंधारात गाडी सोडून आरोपी सुरतच्या दिशेने पसार?
गोळीबार केल्यानंतर दोन आरोपी तिसऱ्या साथीदाराने आणलेल्या दुचाकीवर बसून वेगाने पसार झाले. आरोपींनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीट चौकीजवळील ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर नाही, अशा ठिकाणी आरोपींनी आपली दुचाकी सोडून दिल्याचा संशय आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्राथमिक तपासाच्या आधारे आरोपी सुरतच्या दिशेने पसार झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

गुजरात आणि सुरत पोलीस सतर्क
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर गुजरात पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरत पोलिसांनी शहरात आणि महामार्गांवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेच्या सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.