मुंबई-गोवा महामार्गावरील मदत केंद्रात नागरिकांसह पोलिसांची पाण्याची सोय; कौतुकास्पद उपक्रम
रत्नागिरी:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हातखंबा पोलीस मदत केंद्रात प्रवाशांच्या व पोलिसांच्या सोयीसाठी एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. हातखंबा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी API घुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार नितीन जाधवर यांनी विशेष पुढाकार घेऊन या मदत केंद्रात शुद्ध आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘एक्वागार्ड’ बसवला आहे.
प्रवाशांसह कर्तव्यावरील पोलिसांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हातखंबा परिसरात सतत येणे-जाणे असते. अनेकदा प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत राहावे लागते. तसेच या केंद्रावर अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनाही शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत होती.

हीच अडचण लक्षात घेऊन पोलीस अंमलदार नितीन जाधवर यांनी प्रभारी API घुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली मदत केंद्रात एक्वागार्ड बसवण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे आता प्रवाशांसह कर्तव्यावर असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध झाले आहे.
नागरिकांमधून होत आहे कौतुक
महामार्गावरील पोलीस मदत केंद्रासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारची जनोपयोगी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र जोरदार कौतुक केले जात आहे. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे जनमानसात पोलिसांविषयीचा विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.













