Amravati MLC Election 2026: “मी धाडस केले नसते तर महाराष्ट्र १५ वर्षे मागे गेला असता”; एकनाथ शिंदेंकडून जुन्या बंडाची आठवण

Amravati MLC Election 2026: "मी धाडस केले नसते तर महाराष्ट्र १५ वर्षे मागे गेला असता"; एकनाथ शिंदेंकडून जुन्या बंडाची आठवण

जुन्या पेन्शनसह शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याचा शिंदेंचा दावा

अमरावती:

Amravati MLC Election 2026 संदर्भात मिळालेल्या ताज्या राजकीय घडामोडीनुसार, राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पाच मतदारसंघांत होत असलेल्या या निवडणुकांसाठी महायुतीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे (शिवसेना) उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अमरावतीचा दौरा करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ऐतिहासिक बंडाची आठवण; प्रीती रेवनेंचे मानले आभार
अमरावतीमधील ‘एम डब्लु मंगल कार्यालयात’ आयोजित सहविचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या प्रीती रेवने यांनी आपली माघार घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.

Arihant 1

यावेळी जुन्या बंडाची आठवण काढत एकनाथ शिंदे म्हणाले, "वेळप्रसंगी राणा दाम्पत्य तुरुंगात गेले पण घाबरले नाहीत, मीसुद्धा तसाच आहे. जर मी त्यावेळी धाडस केले नसते, तर महाराष्ट्र १५ ते २० वर्षे मागे गेला असता. तो एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय होता, ज्यामुळे मविआचे सरकार कोसळले."

शिक्षकांच्या प्रश्नांवर आणि दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि जुन्या पेन्शनबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत आश्वासने दिली. ते म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, एकदा कमिटमेंट दिली म्हणजे दिली. शिक्षक हा प्रत्येक नागरिकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किरण सरनाईक हे शिक्षकांची सर्व कामे पूर्ण करतील आणि विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही."

तसेच, राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये दिले जातील आणि त्यानंतर इतर सर्व सवलतीही तातडीने लागू केल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली.

महायुतीसमोर बंडखोरांचे आव्हान
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने या निवडणुकीत पक्षांतर्गत बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला असला, तरी शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत देशपांडे हे अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात मतांच्या विभाजनाची धाकधूक वाढली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला किती फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.