Ratnagiri Crime News: पावस येथे डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग: क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग

Ratnagiri Crime News: पावस येथे डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग: क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग

र्णगड सागरी पोलीस ठाण्यात ७५ कलमान्वये गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू

रत्नागिरी:
पावस येथे डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग झाल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील एका क्लिनिकमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. समीर गिजबिले याच्याविरुद्ध पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपचाराच्या बहाण्याने क्लिनिकमध्ये कृत्य
पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, तिला ६ ऑक्टोबरपासून सर्दी आणि तापाचा त्रास होत होता. त्यामुळे ती पावस येथील क्लिनिकमध्ये डॉ. समीर गिजबिले यांच्याकडे तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून इंजेक्शन व औषधे दिल्याने तिला काही प्रमाणात फरक पडला. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिला मासिक पाळीचा त्रास सुरू झाल्याने ती आपल्या आईसोबत पुन्हा डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी तपासणी करत असताना डॉ. समीर गिजबिले यांनी तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घरात चर्चेनंतर पोलिसांत फिर्याद; गुन्हा दाखल
क्लिनिकमध्ये घडलेला हा प्रकार पीडित तरुणीने काही वेळाने आपल्या आईला सांगितला. त्यानंतर या संतापजनक घटनेबाबत कौटुंबिक पातळीवर चर्चा करून अखेर १६ ऑक्टोबर रोजी रात्री पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. समीर गिजबिले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Ratnagiri Khabardar add image

पूर्णगड पोलिसांकडून अधिक तपास सुरू
वैद्यकीय क्षेत्राला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तीव्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे अधिकारी ए. एम. कुबडे या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.