चांदीच्या दरात मात्र घसरण
नवी दिल्ली:
देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या सोन्याच्या दरातील घसरणीला आता पूर्णविराम मिळाला असून, विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये २४ आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव वधारले आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याला वाढती मागणी मिळत असल्याने दरांना मजबूत आधार मिळाला असून, दिवाळी जवळ येत असताना ग्राहकांना सोन्याची खरेदी करताना अधिक खर्च करावा लागणार आहे.
दिल्ली आणि मुंबईतील सोन्याचे ताजे दर
२० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळच्या उपलब्ध सत्रानुसार, राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४८,२०0 रुपये इतका आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३५,८६० रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४८,०५० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,७१० रुपये नोंदवला गेला आहे. यापूर्वी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत ४०० रुपयांची वाढ झाली होती.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव
देशातील वेगवेगळ्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये समरूपता पाहायला मिळत असून, २० ऑक्टोबर रोजीचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: २४ कॅरेट १,४८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम; २२ कॅरेट १,३५,८६० रुपये प्रति १० ग्रॅम.
मुंबई आणि कोलकाता: २४ कॅरेट १,४८,०५० रुपये प्रति १० ग्रॅम; २२ कॅरेट १,३५,७१० रुपये प्रति १० ग्रॅम.
चेन्नई: २४ कॅरेट १,४८,०५० रुपये प्रति १० ग्रॅम; २२ कॅरेट १,३५,७१० रुपये प्रति १० ग्रॅम.
पुणे आणि बंगळुरू: २४ कॅरेट १,४८,०५० रुपये प्रति १० ग्रॅम; २२ कॅरेट १,३५,७१० रुपये प्रति १० ग्रॅम.
(टीप: हे दर मनीकंट्रोलच्या माहितीनुसार असून प्रत्यक्ष खरेदी करताना घडणावळ आणि स्थानिक करांमुळे किमतीत बदल होऊ शकतो.)
आंतरराष्ट्रीय बाजार आणि चांदीच्या दरातील स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड म्हणजेच प्रत्यक्ष सोन्याचा भाव ४,१२६.84 डॉलर प्रति औंस एवढा आहे. जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होत असतो. सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लागले असून, व्याजदराबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर सोन्याचीपुढील दिशा ठरवणार आहे. दुसरीकडे, सोन्याच्या किमती वाढत असताना चांदीच्या दरात मात्र घसरण नोंदवली गेली आहे. २० ऑक्टोबर रोजी देशात चांदीचा भाव प्रति किलो २,२९,९०० रुपये इतका होता, तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर ५६.६९ डॉलर प्रति औंस वर ट्रेड करत आहे.













