Dapoli Water Conservation News: रुखीत श्रमदानातून एकाच दिवसात उभारले १२ बंधारे; दापोली तालुक्यातील जलसंधारणाचा प्रेरणादायी उपक्रम

Dapoli Water Conservation News: रुखीत श्रमदानातून एकाच दिवसात उभारले १२ बंधारे; दापोली तालुक्यातील जलसंधारणाचा प्रेरणादायी उपक्रम

दापोली तालुक्यात ‘एक दिवस गावासाठी’ उपक्रमांतर्गत जलसंधारण; ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून १२ बंधारे उभे

*दापोली: *भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली तालुक्यातील रुखी ग्रामस्थांनी श्रमदानातून एकाच दिवशी तब्बल १२ बंधारे उभारल्याची उल्लेखनीय घटना समोर आली आहे. ‘एक दिवस गावासाठी’ यासंकल्पनेतून गावातील ग्रामस्थ, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम यशस्वी केला आहे.

पाणी अडवण्यासाठी गावाची सामूहिक चळवळ

लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पाणी अडवण्यासाठी गावाने एकजूट दाखवून सामूहिक पुढाकार घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाचे वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडवून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्र लाट कमी व्हावी, या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

Tata altroz

विद्यार्थी आणि महिलांचा सक्रिय सहभाग

या मोहिमेत ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करत बंधाऱ्यांच्या उभारणीत मोठे योगदान दिले. विशेष म्हणजे, या मोहिमेमध्ये महिला, पुरुष व युवकांसोबतच रुखी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावाच्या विकासासाठी आणि जलसंवर्धानासाठी ग्रामस्थांची एकजूट किती महत्त्वाची असते, हे रुखी ग्रामस्थांनी या उदाहरणातून संपूर्ण कोकणाला दाखवून दिले आहे.