Ratnagiri Dengue Malaria Cases: रत्नागिरी साथीच्या आजारांत वाढ; जिल्ह्यात डेंग्यूचे ६९, तर मलेरियाचे १९८ रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

Ratnagiri Dengue Malaria Cases: रत्नागिरी साथीच्या आजारांत वाढ; जिल्ह्यात डेंग्यूचे ६९, तर मलेरियाचे १९८ रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

गणेशोत्सवातील गर्दी व स्थलांतरित मजुरांमुळे रुग्णसंख्येत वाढ; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

*रत्नागिरी: *रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबरनंतर पावसाने ओढ दिल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, जानेवारी ते सप्टेंबरअखेर जिल्ह्यात डेंग्यूचे ६९ तर मलेरियाचे १९८ रुग्ण आढळून आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यावरून आलेले नागरिक आणि परजिल्ह्यातून आलेले स्थलांतरित मजूर यांच्यामुळे ही रुग्णसंख्या वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पावसाच्या खंडाने साथीचे आजार वाढले

रत्नागिरी जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती, मात्र ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी निराशा केली. पाऊस थांबल्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊन सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

Happy journey marathi

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूच्या ६९ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्ण स्थानिक असून उर्वरित सर्व रुग्ण स्थलांतरित व मजूर आहेत. तसेच मलेरियाच्या १९८ रुग्णांपैकी ११ रुग्ण स्थानिक असून उर्वरित रुग्ण बाहेरून आलेले आहेत. सध्या बहुतांश रुग्णांवर उपचार सुरू असून काही रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

तालुकानिहाय डेंग्यू व मलेरियाची रुग्णसंख्या

तालुकामलेरिया रुग्णडेंग्यू रुग्णमंडणगड२१दापोली१६१खेड२९१गुहागर२९९चिपळूण२१२संगमेश्वर३८९रत्नागिरी३३३८लांजा१४१राजापूर१६३एकूण१९८६९

(स्रोत: जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी)

नागरिकांनी ही खबरदारी बाळगावी:

पाणी साचू देऊ नका: घराभोवती कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

कोरडा दिवस पाळा: डेंग्यू आणि मलेरियाचे डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात होतात, त्यामुळे आठवड्यातून एकदा भांडी कोरडी ठेवा.

पाणी उकळून प्या: पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवा आणि उकळून प्या.

तपासणी करा: सलग तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास तातडीने रक्ताची तपासणी करून घ्या.

वैद्यकीय सल्ला: कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.