Guhagar Leopard News: तळवली परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Guhagar Leopard News: तळवली परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गुहागर तालुक्यात बिबट्याच्या वावराने घबराट: शिगवणवाडीत कुत्र्यांवर हल्ला; वनविभागाने दिल्या सुरक्षेच्या सूचना

गुहागर:
गुहागर तालुक्यातील तळवली परिसरात बिबट्याचा मुक्त वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या संभाव्य हालचालींमुळे शेतात काम करणारे शेतकरी, गुरे चारण्यासाठी रानात जाणारे ग्रामस्थ, तसेच सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले आहेत.

पाळीव प्राण्यांना केले लक्ष्य

तळवली येथील शिगवणवाडी परिसरात या बिबट्याने काही कुत्र्यांना आपले लक्ष्य केले असल्याचे समोर आले आहे. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Lok. Tilak hospi.

वनविभागाकडून पाहणी व सतर्कतेचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने तळवली परिसरात पोहोचून पाहणी केली व बिबट्याच्या हालचालींचा शोध घेतला. या पाहणीदरम्यान बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले नसले, तरी वनविभागाने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

नागरिकांनी एकाकी बाहेर पडणे टाळावे, तसेच रात्री किंवा भल्या पहाटे बाहेर पडताना हातात काठी आणि टॉर्च (बॅटरी) घेऊनच बाहेर पडावे, अशा महत्त्वपूर्ण सतर्कतेच्या सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.