चिपळूण नगरपरिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा भव्य सन्मान; बालकांना पोषणयुक्त फळांचे वाटप

चिपळूण नगरपरिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा भव्य सन्मान; बालकांना पोषणयुक्त फळांचे वाटप

‘सेवा संकल्प अभियान’: शहरातील विविध अंगणवाडी केंद्रांवर पोहोचून नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरव

चिपळूण:
महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने १५ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. समाजातील तळागाळातील बालकांचे पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नगरपरिषदेने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अन् विशेष सत्कार
हा विशेष कार्यक्रम चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शाल, फुलांचे रोपटे आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील लहान बालकांना पोषणयुक्त फळांचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यास खालील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती:

Tata harrier

उपनगराध्यक्ष: डॉ. रूपाली दांडेकर

सभापती: रसिका देवळेकर (महिला व बालकल्याण), हर्षाली पवार (शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक), नीलम जाधव (मागासवर्गीय कल्याण)

उपसभापती: पल्लवी उर्फ राणी महाडिक

नगरसेवक व नगरसेविका: वैशाली कदम, वैशाली निमकर, कांचन शिंदे, मिसबा नाखुदा, स्वीकृत नगरसेविका शितल रानडे, नगरसेवक अजय भालेकर

प्रशासकीय अधिकारी: उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर

सन्मानित अंगणवाडी सेविका व मदतनीस
नगरपरिषदेच्या वतीने खालील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा यथोचित सन्मान करण्यात आला:
श्रीमती मीरा जुवळे, अमरीन रेहान खतीब, अश्विनी अशोक जोगळे, श्रद्धा सुनील नानीस्कर, शितल श्याम नवरत, मयुरी महेश पवार, प्रणिता उदय कपडेकर आणि स्वरा स्वप्नील जाधव.

उत्कृष्ट नियोजन व सर्वस्तरांतून कौतुक
या संपूर्ण उपक्रमाचे नेटके नियोजन उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी केले. सेवा तत्त्वावरील उद्यान तांत्रिक कार्यकारी सुरज सकपाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सेवा तत्त्वावरील डेटा ऑपरेटर सायली खेतले, सेजल महाडिक आणि उद्यान विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नगरपरिषदेच्या या संवेदनशील आणि कौतुकास्पद उपक्रमाचे शहरातील नागरिकांमधून जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.