Gunratna Sadavarte: “एकनाथ शिंदे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”; गुणरत्न सदावर्तेंचे शिवसेनेच्या नेत्यांना खडेबोल

टायगर श्रॉफ भेट आणि ५०० कोटींच्या आरोपांवरही सदावर्तेंची रोखठोक प्रतिक्रिया; राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी

मुंबई:

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प बोलून दाखवला, तसेच आगामी काळात तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे म्हटले. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिवसेना नेत्यांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. "एकनाथ शिंदे कधीही नजीकच्या काळात मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत," असे म्हणत सदावर्तेंनी शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"एकनाथ शिंदेंनी गँगस्टरसारखे बोलू नये"
अभिनेता टायगर श्रॉफवरील कथित हल्ल्याच्या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि त्यांच्या भेटीचा गुणरत्न सदावर्तेंनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. "एकनाथ शिंदे म्हणतात गोळीला गोळीने उत्तर देणार, पण एकनाथ शिंदेने काय टोळी काढली आहे का, गोळी घालायला? संवैधानिक पदावर असणारी व्यक्ती अशी कशी बोलू शकते? तुम्ही एन्काऊंटर करणार का? एकनाथ शिंदे, तुमच्या जिभेला संविधानाच्या मर्यादेत ठेवा. तुमचे कायदेशीर हाल होतील, बिष्णोई गँगचा खात्मा करणार असे तुम्ही बोलू शकत नाही. गँगस्टरसारखे मंत्री महोदयांनी बोलू नये, राज्यपालांनी याची दखल घ्यावी," अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे.

Radhakrushna patapedhi

तसेच, "टायगर श्रॉफच्या घरी एकनाथ शिंदे गेले, पण घराबाहेर पडताना ना जॅकी श्रॉफ आला, ना टायगर श्रॉफ. या विषयाचे राजकारण एकनाथ शिंदेंनी करू नये," असे ते म्हणाले. याशिवाय, पूर्णेकर कुटुंबाला शिंदे भेटायला गेले नाहीत, असा आरोप करत "शिंदे साहेब, तुम्ही पूर्णेकर प्रकरणातील आरोपीला ओळखता का? कारवाई आवश्यक आहे का?" असा सवालही त्यांनी विचारला.

५०० कोटींच्या आरोपांवर उदय सामंत उत्तर देतील
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या कथित आरोपांबाबत बोलताना सदावर्ते म्हणाले की, "स्वतःच्या हिशोबाची खेळी त्यांनी केली आहे. यावर मंत्री उदय सामंत यांच्याशी बोलले पाहिजे, तेच या ५०० कोटींच्या विषयावर बोलू शकतील. आम्हाला त्यांचे उत्तर हवे आहे."