Sanjay Raut Raj Thackeray Political Statement: ‘नरेंद्र मोदींची एक्सपायरी डेट संपली, देशात वातावरण बदलतंय’ – संजय राऊत

Sanjay Raut Raj Thackeray Political Statement: ‘नरेंद्र मोदींची एक्सपायरी डेट संपली, देशात वातावरण बदलतंय’ - संजय राऊत

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा, एपस्टीन प्रकरण आणि राज ठाकरेंच्या दाव्यावर संजय राऊतांचे समर्थन

मुंबई:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच "पुढच्या ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल आणि काही काळासाठी देशात पंतप्रधान नसेल," असे अत्यंत धक्कादायक वक्तव्य केले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे समर्थन दिले असून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "नरेंद्र मोदी यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे. एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात होईल आणि मे अखेरपर्यंत राजकीय स्थितीत मोठा बदल होईल," असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यावर आणि प्रोटोकॉलवर बोट
संजय राऊत यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. "मी वारंवार सांगतोय की देशातील वातावरण आता झपाट्याने बदलत आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतात आले, त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना मुंबईत बोलावून घेतले आणि जामनगरला बैठक झाली. हे नेते दिल्लीत आल्यावर नेहमी पंतप्रधानांना भेटत असतात; मात्र प्रथमच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मोदींना भेटले नाहीत आणि ते थेट मुंबईत आले. आतापर्यंत परदेशी पाहुण्यांना थेट अहमदाबादला नेण्याची जी प्रथा होती, ती सुद्धा यावेळी मोडली गेली," असे राऊत म्हणाले.

एपस्टीन प्रकरण आणि फाईल्सवरून मोदी सरकारला इशारा0
यावेळी बोलताना राऊतांनी खळबळजनक दावे केले. "अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आले असतानाच, मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांचा ‘एपस्टीन’सोबतचा एक धक्कादायक फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि तो थेट अमेरिकेतून आला. हा मोदी सरकारसाठी एक स्पष्ट इशारा आहे की फाईल अजून बंद झालेली नाही. फाईल क्रमांक ५०३, ५०८ आणि ५६७ अद्याप ओपन आहेत. याचा अर्थ देशातील व जगातील एकंदर परिस्थिती आता मोदींच्या विरोधात चालली आहे," असा दावा त्यांनी केला.

Tata safari

तसेच, "देशात आणि जगात मोदींना प्रचंड विरोध होत असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. दहशत निर्माण करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांचा वापर केला जात आहे. आपले गुन्हे लपवण्यासाठी न्यायमूर्तींचे खून झाले आणि अनेकांचे आवाज दाबले गेले," अशी गंभीर टीकाही त्यांनी केली.

मोदी-अदानी मैत्री आणि सोशल मीडियावरील डॉक्युमेंट्रीवर भाष्य
मोदी आणि अदानी यांच्या मैत्रीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "मोदी-अदानी यांची फ्रेंडशिप जगजाहीर आहे. या मैत्रीवर आधारित असलेली डॉक्युमेंट्री सोशल मीडियावरून डिलीट व्हावी आणि त्यावर बंदी यावी, यासाठी भाजप सरकारकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. असेար तरीही ती डॉक्युमेंट्री लोकांपर्यंत पोहोचलीच."

अलबेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) लागलेल्या आगीचा संदर्भ देत राऊत म्हणाले, "मी तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला म्हणून माझ्यावर अराजकता पसरवण्याचा आरोप करण्यात आला. पण तिथे सुद्धा देशातील जमिनी एका उद्योगपतीला दिल्या जात होत्या आणि सुप्रीम कोर्टात निकाल त्या उद्योगपतीच्या बाजूने लागल्यामुळे जनता रस्त्यावर उतरली, हे मला सांगायचे होते. हे वास्तव मांडणे म्हणजे अराजकता माजवण्याचा प्रयत्न कसा असू शकतो?" असा सणसणीत सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.0