Dapoli Nante Jambhalwadi Woman Missing Case: दापोलीतील नानटे जांभळवाडीतून ३५ वर्षीय महिला गूढ रीतीने गायब

Dapoli Nante Jambhalwadi Woman Missing Case: दापोलीतील नानटे जांभळवाडीतून ३५ वर्षीय महिला गूढ रीतीने गायब

माहेरी जात असताना महिला बेपत्ता; दापोली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

दापोली (रत्नागिरी):
दापोली तालुक्यातील नानटे जांभळवाडी येथून एक ३५ वर्षीय महिला अचानक घराबाहेर पडल्याची आणि ठरलेल्या वेळी माहेरीही पोहोचली नसल्याची अत्यंत संशयास्पद व हदयद्रावक घटना समोर आली आहे. संध्याकाळची वेळ असल्याने बाहेर न जाण्यास सांगूनही ती कोणालाही न सांगता निघून गेल्याने आणि माहेरच्या घरी न पोहोचल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नानटे जांभळवाडी (ता. दापोली) येथील रहिवासी असलेल्या शिल्पा संदेश भेकरे (वय ३५) असे या बेपत्ता महिलेचे नाव आहे. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १६ वाजण्याच्या सुमारास त्या खेड तालुक्यातील किंजळे कळकराय (पोस्ट शिंगरी) येथील आपल्या माहेरी जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या.

कुटुंबीयांच्या रोखण्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर
संध्याकाळची वेळ असल्याने अंधारात घराबाहेर जाऊ नका, असे तिच्या पती व कुटुंबीयांनी तिला आग्रहाने सांगितले होते. मात्र, तिने कोणाचेही ऐकले नाही आणि ती तशीच घराबाहेर निघून गेली. त्यानंतर ती खेड येथील माहेरी सुखरूप पोहोचली किंवा नाही, याबाबत खात्री करण्यासाठी फिर्यादी तथा सासू वैजयंती शिवाजी भेकरे (वय ५५) यांनी तिच्या माहेरच्या घरी फोन करून चौकशी केली. मात्र, ती माहेरी पोहोचलीच नसल्याचे समोर आल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.

Arihant 4

पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल
कुटुंबीयांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी नानटे परिसर तसेच आजूबाजूच्या भागात तिचा सर्वत्र कसून शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी रात्री ७:१२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली.

या फिर्यादीनुसार, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) तसेच भा.द.वि. कलम ३६५ नुसार अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने अधिक तपास करत असून महिलेचा शोध घेतला जात आहे.