खेड : तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविधांगी उपक्रम राबवत ग्रामस्थांमध्ये स्वरूपात जनजागृती यापाठोपाठच स्वच्छ अभियानांतर्गत ‘कचरामुक्त’ गाव करण्यासाठी पुढे सरसावली आहे. ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत घरातील कचऱ्याची योग्यतेने विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सूचना केल्या जात आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यावर ग्रामस्थांकडून भर दिला जात आहे.
देवघर – सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात कोकण विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असला तरी केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर गावात पुरेपूर स्वच्छता राखून नागरिकांचे आरोग्यमान सदृढ राखण्याच्या दृष्टीने विविधांगी उपक्रम राबवण्यावर भर दिला जात उपक्रम राबवण्यावर भर दिला जात आहे. प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करणाऱ्या ग्रामपंचायतीने आता स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत संपूर्ण गाव कचरामुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामसेवक दीपक कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही रॅलीही काढण्यात येत आहे. या रॅलीत ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. ग्रामसेवक दीपक कदम ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व विषद करत ग्रामपंचायतीच्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 09/Nov/2024