पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांची मोहीम; ५७७ बंधाऱ्यांमध्ये लखो लिटर पाणी साठवले
रत्नागिरी : पाण्याचा तीव्र सामना करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात वनराई बंधाऱ्यांच्या मोहिमेला मोठा वेग आला असून, तालुक्यात जवळपास ५७७ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. यामध्ये लाखाों लिटर पाणी साठले असून, सहराहून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी दिली आहे. राज्यभर जलसंकट उभे राहिले असताना, रत्नागिरी जिल्ह्यातही भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून मोठी जागृती मोहीम राबवली जात आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग आणि पोमेंडी बु., तरवळ, गोलपमध्ये सर्वाधिक बंधारे
पालकमंत्री उदय सामंत यांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी तालुक्यातही ग्रामपंचायतींनी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी वनराई बंधारे बांधण्यास मोठा पुढाकार घेतला आहे. काही ठिकाणी स्वयंकृत पदाधिकाऱ्यांनी बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून, तालुक्यातील पोमेंडी बु. ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सर्वाधिक १९ बंधारे बांधले आहेत. त्यानंतर तरवळ ग्रामपंचायतीने १५, गोलप ग्रामपंचायतीने १३, तर नानीज ग्रामपंचायतीने १२ बंधारे बांधले आहेत. तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. दरम्यान, काही गावांमध्ये पर्जन्यमान कमी असले तरी, वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची झळ काही प्रमाणात कमी होत आहे. सध्या बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे.














