शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार : २०२४-२५ आणि २०२५-२६ च्या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन; १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार : २०२४-२५ आणि २०२५-२६ च्या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन; १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत

रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची माहिती; खेळाडू व मार्गदर्शकांनी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या प्रतिष्ठित ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींकडून १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत केवळ ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली आहे.

अर्ज कसा आणि कुठे करावा?
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील गुणवंत क्रीडापटू व क्रीडा क्षेत्रात आयुष्यभर मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व साहसी क्रीडापटूंनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ([https://sports.maharashtra.gov.in](https://sports.maharashtra.gov.in)) भेट देऊन १५ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Monas products