तिवरी बंदरातून मोहिमेचा शुभारंभ; वरवडे, मालगुंड आणि जयगड येथे जनजागृतीपर पथनाट्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Maharashtra NCC Directorate च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोंकण ज्ञानतरंग’ मोहिमेच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात पार पडला. सकाळी ठीक ७:०० वाजता वरावडे गावातील तिवरी बंदर येथून वरवडे गावचे सरपंच गजानन हेडाऊकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बोट पुढील टप्प्यासाठी, म्हणजेच जयगड बंदरासाठी रवाना करण्यात आली.
या विशेष शिबिरादरम्यान एनसीसी कॅडेट्सच्या पथनाट्य पथकाने स्थानिक नागरिकांमध्ये सामाजिक आणि विविध शैक्षणिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी प्रभावी पथनाट्ये सादर केली. कॅडेट्सच्या या कलात्मक सादरीकरणाला स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
पथनाट्याचे तीन प्रमुख ठिकाणी सादरीकरण:

पहिले सादरीकरण: वरवडे गावातील श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात पार पडले. या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कॅडेट्सच्या सादरीकरणाला दाद दिली.
दुसरे सादरीकरण: मालगुंड येथील बळीराम पारकर विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यालयाच्या तब्बल ६२७ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सामाजिक संदेश ग्रहण केला.
तिसरे सादरीकरण: जयगड येथील मुख्य परिसर आणि किनारपट्टी भागात पार पडले.
स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. एनसीसी कॅडेट्सच्या या धाडसी व जनजागृतीपर मोहिमेचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.













