रत्नागिरी जिल्हा दक्षिण समन्वयक पदी दीपक पटवर्धन यांची नियुक्ती

रत्नागिरी : भाजपामधून बीजेपीचे ज्येष्ठ नेते बाळ माने ठाकरे गटात गेल्यावर भाजपकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता माजी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांची नवी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2024 साठी रत्नागिरी दक्षिण जिल्हा समन्वय पदी दीपक पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भारतीय जनता पार्टी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.