किरण सामंत यांच्या लांजा तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लांजा : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या लांजा तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले.

लांजा शहरातील कीर्ती महाल येथे उभारण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन लांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, लांजा गावचे मानकरी नाना शेट्ये यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना (शिंदे गट) लांजा तालुका अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील उर्फ राजू कुरुप, नगराध्यक्ष मनोहत बाईत, सचिन डोंगरकर, प्रसाद भाईशेट्ये, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, विराज हरमले यांसह युतीमधील राष्ट्रवादी, आरपीआय, बळीराज सेना या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांजा येथे महायुतीचे प्रचार कार्यालय उभारण्यात आल्याने शिवसेना, भाजप कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सध्या विधानसभा निवडणूक प्रचार यंत्रणा शिगेला पोहोचली असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच पहायला मिळत आहे.

लांजा-राजापूर-साखरपा विधानभा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी विधानसभा क्षेत्रात आपला प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांसह युतीमधील मित्र पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी तसेच मतदारसंघात संपर्क साधण्यासाठी तालुका प्रचार कार्यालय लांजा शहरामध्ये उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरी येथील ढोलपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत किरण सामंत यांच्या जयघोषात करण्यात आले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी महायुतीमधील मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 11/Nov/2024