रत्नागिरी : येथील गोळप ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत दाभिळवाडी, मोरवठार आणि बौद्धवाडी भागात महायुतीचे उमेदवार ना. उदय सामंत यांच्या प्रचाराला दमदार सुरुवात झाली असून येथील तरुण वर्ग स्वयं प्रेरणेने प्रचारात सहभागी होताना दिसत आहे. ना. सामंत यांच्या प्रचारात महिला वर्गही उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून ना. सामंत यांनी गोळपमध्ये केलेल्या विविध विकासकामांचा विचार करता प्रचारादरम्यान सगळीकडे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते महेश भाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पावसकर दिपक भाटकर,महिला शाखाप्रमुख वैदेही पावसकर, विधी भाटकर, नेहा भाटकर,अभय पावसकर, अवधूत पावसकर, विराज पालकर, किर्ती पावसकर, पूर्वा पावसकर, विकास आंबेकर, प्रकाश भाटकर, सिध्दार्थ पालकर, शरद पालकर, बाळा नारकर, अजय आंबेकर, सौरभ पावसकर, प्रथमेश भाटकर,राज शिंदे याबरोबरच या भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 11-11-2024














