कार्तिकीच्या जत्रेची रत्नागिरीत तयारी सुरु

रत्नागिरी : शहरातील विठ्ठल मंदिराच्या कार्तिकी एकादशीनिमित्त भरणाऱ्या जत्रेची रत्नागिरी पालिकेने पूर्वतयारी सुरू केली आहे. यामध्ये लाईट व्यवस्थेसह स्वच्छतेच्या कामांचा समावेश आहे.

रत्नागिरीतील हे विठ्ठलमंदिर हे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखले जाते.

कार्तिकी एकादशी जत्रेच्या दिवशी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरीलही विविध व्यवसायिक रत्नागिरीत येतात. त्यामुळे दिवसभर विठ्ठल मंदिरसह आजूबाजूच्या सर्व परिसरात विविध दुकाने थाटलेली असतात. त्यामुळे भाविकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होत असते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने आवश्यक ती कामे पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.

रत्नागिरी पालिकेने स्वच्छतेसह वीज पुरवठ्यासंदर्भात पूर्वतयारी सुरू केली असतानाच व्यापारी वर्ग रविवारपासूनच आपल्या व्यवसायाच्या जागेचे नियोजन करणार आहेत. दरवर्षी दोन दिवस अगोदर जत्रेतील व्यावसायिक आपआपल्या दुकानांच्या जागा निश्चित करण्यासाठी धावपळ करतात. ज्या दुकानांबाहेर व्यवसाय लावायचा आहे त्या ठिकाणच्या दुकानदारांची परवानगी घेण्यासाठी रविवारपासून जत्रेसाठी येणारे जिल्ह्याबाहेरील दुकानदार संबंधितांना संपर्क साधणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 11-11-2024