चिपळूण : कामथे येथे प्रौढाची आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील कामथे खुर्द हरेकरवाडी येथे ५७ वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धोंडू बाबू सोलकर असे त्यांचे नाव आहे. ही घटना दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंडू सोलकर यांनी घराच्या हॉलमध्ये लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 11/Nov/2024