रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील गटारांची लांबी २२० कि.मी. पर्यंत जाणार आहे. सध्या शहरात सुमारे १५० कि.मी. लांबीची गटारे आहेत. उर्वरित ७० कि.मी. लांबीची गटारे नव्याने बनवली जाणार असून यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. संपूर्ण शहरात ज्या ज्या ठिकाणी गटारे नाहीत किंवा जुनी लहान गटारे आहेत, त्या ठिकाणी नवी गटारे बांधली जाणार आहेत.
रत्नागिरी शहरामध्ये जुनी अनेक गटारे आहेत. परंतु, यातील अनेक गटारे फारच जुनी असल्याने ती कमी खोलीची आणि कमी रुंदीची आहेत. आता लोकसंख्या वाढली असल्याने सांडपाणी सोडण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे ज्या ठिकाणी अशी जुनी छोटी गटारे आहेत, ती गटारे नव्याने बांधली जाणार आहेत. स्मार्ट सिटीतील कामांमध्ये या २०० कोटी रुपये खर्चाच्या नवीन गटारांचा समावेश आहे.
शहरात सध्या १५० किमी. लांबीची गटारे आहेत. यामध्ये काही नव्याने गटारे बांधण्यात आली असून आणखी ७० किमी. लांबीची गटारे झाल्यानंतर शहराच्या १०.४९ किमी. च्या परिसरात गटार नाही, असा एकही भाग शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सांडपाण्यासह पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरीत्या होऊन पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण संपुष्टात येणार आहे. विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गटारांच्या कामाला गती मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 11/Nov/2024














