खेड : महाडनाका येथे १७ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कांस्य थेरपी शिबिर

खेड : येथील पेन्शनर असोसिएशन व कांची कांस्य थेरपी सेंटर खेड यांच्या संयुक्त विद्यमाने १७ रोजी महाडनाका ब्रह्मकुमारी सेवा केंद्र समोर मोफत कांस्य थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खेड शहरातील महाडनाका येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्र समोर कांस्य थेरपी सेंटर सुरू झाले आहे. गुडघे दुखी, सांधे दुखी, वात, पित्त व कफ प्रकोप, अर्धशिर्शी आदींसह थकवा दूर करून निद्रानाशाची समस्या कमी होण्यास या थेरपीचा फायदा होतो. या केंद्राच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून खेड तालुका पेन्शनर असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवार दि. १७ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी कांस्य थेरपी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गुरुवार दि. १४ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक असून पेन्शनर असोसिएशनचे दत्तात्रय धुमक यांच्याकडे किंवा कांची कांस्य थेरपी सेंटर ब्रह्मकुमारी सेवा केंद्र समोर महाडनाका येथे नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 11/Nov/2024