रत्नागिरी : धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला

रत्नागिरी : जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून, सकाळच्या वेळी धुकं पडत आहे. महामार्गावरही धुकं पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. तसेच जिल्ह्यातूनही अनेकजण पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. यांचा परतीचा प्रवास सुरू असून, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. सकाळच्या वेळी महामार्गावर धुकं पडत असून, त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवावे लागत आहे. समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची भीती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 11/Nov/2024