रत्नागिरी : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध नावीन्यपूर्ण वैयक्तिक लाभाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून संबंधित लाभार्थ्यांना दोन दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप, १० शेळ्या, मेंढ्यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाकडून ५० टक्के अनुदान तर अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेंतर्गत दोन दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप, दहा शेळ्या मेंढ्यांचे गट वाटप, एक हजार कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 11/Nov/2024














