रत्नागिरी : आंबा विक्रीसाठी ‘मार्केट यार्ड’ तयार करण्याची व्यावसायिकांकडून मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सुसज्ज असे मार्केट यार्ड असावे, अशी मागणी आंबा व्यावसायिकांमधून होत आहे. आंबा व्यावसायिकांना आपला माल विकण्यासाठी मुंबई, पुणे, वाशी येथे जावे लागते. यासाठी मोठा खर्च येतो. तसेच काहीवेळा दलालांकडून फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. याचा फटका व्यावसायिकांना बसतो. यामुळे रत्नागिरीतच मार्केट यार्ड उभारावे, अशी मागणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना परजिल्ह्यात जावे लागणार नाही. तसेच जिल्ह्याबाहेरील ग्राहक येथे येऊन पर्यटनालाही चालना मिळेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 11/Nov/2024