रत्नागिरी : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे बंधनकारक

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांमध्ये कार्यरत कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांच्या मालकांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या सूचनांनुसार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील मतदारांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विविध नियम जारी करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 11/Nov/2024