रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे प्रौढ घरातच मृतावस्थेत आढळला. उत्तरीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात आणले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश रामचंद्र पांचाळ (वय ५४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश पांचाळ हे घरात एकटेच रहात होते. शनिवारी ते घराबाहेर कुठेही दिसून आले नाहीत म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात जावून पाहिले असता ते मृतावस्थेत आढळले. या बाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 11/Nov/2024














