चिपळूण : पेठमाप येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला पकडले

चिपळूण : शहरातील पेठमाप येथे दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला चिपळूण पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ७ हजार ४० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कादीर तय्यब मेमन (४१, रा. पेठमाप) याला अटक करण्यात आली असून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी ही घटना घडली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादीर मेमन हा दुचाकीने गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पेठमाप येथे मेमन याला पकडले असता कापडी पिशवीत ७ हजार ४० रुपये किमतीचा गुटखा सापडला. यामध्ये ६ हजार ३३६ रुपयांच्या केसरयुक्त विमल पान मसाल्याचे ३२ पॅकेट व ७०४ रुपयांचा व्ही-१ तंबाखू ३२ पॅकेटचा समावेश होता. तसेच ५० हजारांची दुचाकी असा एकूण ५७ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 11/Nov/2024