रत्नाागिरी : मुरुगवाडा येथे गांजासदृश पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथे १ हजार ८०० रुपयांचा गांजासदृश पदार्थ आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२० वा. सुमारास करण्यात आली. कमल प्रसाद पतीराम चौधरी (२६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉस्टेबल कौस्तुभ जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा मुरुगवाडा पांढरा समुद्र येथे ५८ ग्रॅम गांजा सदृश पदार्थ आपल्या ताब्यात बाळगून होता. त्याच्याकडून एक मोबाईल, रोख रक्कम, एक पाउच असा एकूण १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरोधात एन. डी. पी. एस. अॅक्ट १९५८ चे कलम ८ (क), २० (ब) (२) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 11/Nov/2024