रत्नागिरी : शहरातील परटवणे परिसरात बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास करण्यात आली. दत्ताराम तुकाराम सावंत (५४) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा परटवणे येथील एका पडक्या टपरीच्या आडोशाला लोकांकडून स्वतःच्या फायद्यासाठी पैसे स्वीकारून कल्याण मटका जुगार खेळ चालवत होता. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ हजार १५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 11/Nov/2024














